पुणे महापालिकेत काकडे गटाला झुकते माप

pune mahanagar palika

पुणे : पुणे महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये सत्ताधारी भाजपकडून माजी खासदार संजय काकडे यांच्या तीन समर्थक नगरसेवकांची वर्णी लागली आहे.आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर काकडे यांना झुकते माप दिल्याची चर्चा आहे.

स्थायी समितीवर रिक्त झालेल्या आठ जागांसाठी भाजपकडून विद्यमान अध्यक्ष हेमंत रासने, राहुल भंडारे, राजाभाऊ लायगुडे, अर्चना पाटील, मनीषा कदम आणि महेश वाबळे यांची तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून बंडू तात्या गायकवाड व प्रदीप गायकवाड यांची निवड केली आहे. भाजपकडून स्थायी समितीवर संधी देताना प्रामुख्याने आगामी महापालिका निवडणूका डोळ्यासमोर ठेवून नेमणुका करण्यात आल्या आहेत.

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि खासदार गिरीश बापट यांनी पालिकेत लक्ष घातल्यामुळे काकडेही अलिप्त होते. मात्र, ही दोन्ही नेत्यांना बाजूला सारुन थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीच आता पुण्यात लक्ष घातले आहे. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीची व्ह्यूह रचना म्हणून फडणवीस यांनी काकडे यांना आता पुन्हा ताकद देण्याचे काम केले असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सहापैकी अर्चना पाटील, राहुल भंडारे आणि राजाभाऊ लायगुडे या तीन काकडे समर्थक नगरसेवकांची निवड झाली आहे. तर आमदार माधुरी मिसाळ समर्थक महेश वाबळे, माजी आमदार योगेश टिळेकर समर्थक मनिषा कदम यांचाही समावेश आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER