जमावबंदी आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम केवळ जनतेसाठीच काय?

पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कार्यक्रमात 'सोशल डिस्टन्सिंग'चा फज्जा

Ajit Pawar

पुणे :- पुण्यात आज सकाळी औंध – रावेत उड्डाणपुलाचे उद्घाटन करण्यात आले. उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन  झाले. मात्र, या कार्यक्रमात नियोजनाचा मोठा अभाव दिसून आला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी. शासनाच्या नियमांचं पालन करावं असं सांगण्यात येतं. परंतु, चक्क उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमातच सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला पाहायला मिळाला. राज्यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण मुंबईनंतर पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे आहेत. त्यातच अशा कार्यक्रमाची भर पडली तर कोरोनाचा उद्रेक वाढण्याची भीती आहे.

उपमुख्यमंत्र्यांच्याच कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत असेल तर सामान्य नागरिकांचं काय? जमावबंदी आणि सोशल  डिस्टन्सिंगचे  नियम केवळ  जनतेसाठीच आहेत काय, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो.

दरम्यान, लॉकडाऊन वाढवायचा की नाही, नियम या सर्व बाबींसाठी निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारला दिला जाईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं.Web Title : Are the rules of curfew and social distance only for the public?

(Maharashtra Today : Latest and breaking marathi news from Mumbai City, Nagpur City, Thane City, Pune City, Aurangabad City, Kolhapur City, Sangli City, Ratnagiri City, Nanded City and all other cities of Maharashtra.)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER