पुण्यात १ मेनंतर ज्येष्ठ नागरिकांसह दुसऱ्या डोसला प्राधान्य मिळेल : महापौर मुरलीधर मोहोळ

Murlidhar Mohad - Maharastra Today
Murlidhar Mohad - Maharastra Today

पुणे : पुण्यात १ मेनंतर ज्येष्ठ नागरिकांसोबतच दुसऱ्या डोसला प्राधान्य देण्यात येईल. तसेच १ मेनंतर खासगी रुग्णालयांना कंपन्यांनकडून लस खरेदी करता येईल. त्यानंतर पालिकेकडून लस पुरवठा केला जाणार नाही, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मोहोळ यांनी सांगितले की, “केंद्राने १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दुसरा डोस घेणाऱ्यांना लस मिळणार का? अशा शंका उपस्थित होत आहेत. या पार्श्वभूमीवर आज महापालिका आयुक्त व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. १ मे पासून लसीकरणाची दिशा ठरवण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने पहिला डोस घेतलेले २ लाखांहून अधिक ज्येष्ठ नागरिक, १५ हजार आरोग्य सेवक, ४५ हजार फ्रँटलाईन वर्कर्स यांना प्राधान्य दिले जाईल.”

तसेच १ मे नंतर राज्य सरकारकडून लसींचा पुरवठा केवळ महापालिका रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर होईल. आता खासगी रुग्णलयांना थेट कंपन्यांकडून लस विकत घेता येईल. सध्या ७३ खासगी रुग्णालयात लसीकरण केंद्र आहेत, असे मोहोळ यांनी नमूद केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button