मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याला तत्त्वतः मंजुरी; अमित देशमुखांची माहिती

Amit Deshmukh - Ajit Pawar

मुंबई :- फडणवीस सरकारच्या (Fadnavis Government) काळात महत्त्वाकांक्षी मानल्या जाणाऱ्या मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेला महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi) तत्त्वत: मंजुरी दिली आहे. याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी दिली. योजना गुंडाळणे किंवा रद्द करणे अशी चर्चा कधीही झाली नाही. मराठवाडा वॉटर ग्रीड हा मराठवाड्यासाठी महत्त्वाचा  प्रकल्प आहे. आघाडी सरकारच्या दृष्टिपथात हा प्रकल्प नेहमीच राहिला. मात्र, कोरोना संकटामुळे हा प्रकल्प सरकारच्या विचाराधीनच होता, असे देशमुख म्हणाले.

या प्रकल्पाबाबत अमित देशमुख यांनी ट्विटच्या माध्यमातून माहिती दिली आहे. या प्रकल्पामुळे मराठवाड्याची खूप जुनी मागणी मान्य झाली आहे. जायकवाडी, उजनी या शाश्वत स्रोतामधून औरंगाबाद, बीडसह लातूर जिल्ह्यासाठी पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याला राज्य मंत्रिमंडळाची लवकरच मान्यता मिळणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याला बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत तत्त्वत: मंजुरी देण्यात आली.

“मराठवाड्यातील हे जिल्हे कायम दुष्काळी आहेत. या भागाला कायमस्वरूपी पिण्याचे पाणी देणे ही आमची भूमिका राहिली आहे. आज हे स्वप्न पूर्ण होत आहे, आघाडी सरकार मराठवाड्याच्या विकासासाठी बांधील आहे. सुरुवातीच्या काळात सरकार कामाला लागले तर खरे, मात्र त्यानंतर कोरोना संकट ओढवले. त्यामुळे विकासाची कामे मागे पडली. पण योजना गुंडाळणे किंवा ती रद्द करणे, अशी चर्चा कधीही झाली नाही.” असे देशमुख म्हणाले.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button