टिकटॉक कमबॅकच्या तयारीत

TIK TOK

नवी दिल्ली : भारतात पुन्हा आपला जम बसविण्याचा प्रयत्न टिकटॉक या चिनी अॅपकडून सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. सरकारच्या दिशानिर्देशानुसार काम करण्यास तयार असल्याचे टिकटॉक इंडियाकडून स्पष्ट करण्यात आले होते. आपले अॅप भारतात पुन्हा कार्यान्वित होईल, असे टिकटॉकला वाटत असले, तरी एकंदरीत परिस्थिती पाहता सद्यस्थितीत टिकटॉकचे कम बॅक अशक्य असल्याचे जाणकारांचे मत आहे .

दरम्यान, देशात टिकटॉक संबंधी नव्याने वातावरण तयार होईल, आणि कोट्यवधी युझर्स याचा वापर करतील, असा विश्वास टिकटॉक इंडियाचे प्रमुख निखिल गांधी यांनी कर्मचाऱ्यांसाठी लिहिलेल्या पत्रात व्यक्त केला आहे. कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करताना निखिल गांधी यांनी त्यांच्या पत्रात म्हटले आहे की, भारतातील नियमांचे पालन करण्याची टिकटॉकची तयारी असून युझर्सची माहिती आणि त्याच्या गोपनीयतेची विशेष काळजी घेतली जाईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER