पंढरपुरात समाधान आवताडेंचा विजय निश्चित, भालकेंचे समर्थक मतमोजणी केंद्रातून बाहेर

Maharashtra Today

पंढरपूर : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत (Pandharpur-Mangalvedha Assembly by-election) भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे यांची आघाडी कायम असून राष्ट्रवादीचे भगीरथ भालके हे पिछाडीवर आहेत. त्यामुळे मतमोजणी कक्षात आलेले भालके यांचे समर्थक मतमोजणी केंद्रातून बाहेर पडत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

२३ व्या फेरीपर्यंत मंगळवेढा शहरातील मतदानाची मतमोजणी होणार आहे. २४ व्या फेरीपासून मंगळवेढा तालुक्यातील गावांची मतमोजणी होणार आहे. २२ व्या आणि २३ व्या फेरीत सुद्धा भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे यांनी आघाडी घेतली आहे. २४ व्या फेरीअखेर समाधान आवताडे ६३५६ मतांनी आघाडीवर आहेत, तर २२ व्या फेरीअखेर ३९०० मतांची आघाडी घेतली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button