पंढरपुरात राष्ट्रवादीचे भगीरथ भालके पुढे, भाजपचे समाधान आवताडे पिछाडीवर

Bhagirath Bhalke - Samadhan Awatade

पंढरपूर : राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या आणि राष्ट्रवादीसह भाजपनेही प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा आज निकाल लागणार आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके (Bhagirath Bhalke)विजयी होणार की भाजपचे उमेदवार समाधान आवताडे ( Samadhan Avtade)बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, सुरूवातीला हाती आलेल्या कालानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे भगीरथ भालके पुढे आहेत. तर भाजपचे समाधान आवताडे पिछाडीवर आहेत. सुरूवातीच्या आकडेवारीनुसार राष्ट्रवादीचे भगीरथ भालके जवळपास ८०० मतांनी पुढे आहेत. मात्र दुपारी १२ वाजेपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button