पंढरपुरात भाजपाने विजयाचा गुलाल उधळला, समाधान आवताडेंचा विजय निश्चित

Pandharpur BJP Won - Maharashtra Today

सोलापूर : राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या आणि राष्ट्रवादीसह भाजपनेही प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत अखेर भाजपच्या समाधान आवताडे यांनी विजयी आघाडी घेतली आहे. राष्ट्रवादीसह भाजपानेही प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत चुरशीची लढत पाहायला मिळाली. मात्र, एकदा पिछेहाट झाल्यानंतर भगिरथ भालके हे शेवटपर्यंत आवताडेंची आघाडी तोडूच शकले नाहीत.

समाधान आवताडे यांना ३५व्या फेरीअखेर ४५४९ मतांची आघाडी होती. त्यानंतर, आवताडे यांच्या घराबाहेर भाजपा समर्थकांकडून विजयी जल्लोष करण्यात आला. ३७ व्या फेरीअखेर आवताडे यांनी ६०१० मतांनी आघाडी घेतली आहे. आता शेवटची फेरी शिल्लक असल्याने आता त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. समाधान आवताडे हे आता मतमोजणी केंद्रावर दाखल झाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button