राज्य सरकारलाही काही अधिकार आहेत, आमच्या मते भीमा कोरेगावचा तपास योग्य दिशेने सुरू नाही- शरद पवार

Sharad Pawar

मुंबई : भीमा कोरेगाव प्रकरणी राष्ट्रवादीचे (NCP) प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांची आज त्यांच्या प्रमुख मंत्र्यांसोबत बैठक झाली. या बैठकीनंतर विविध मुद्दे बाहेर आलेत. भीमा कोरेगाव आयोगाला मुदतवाढ मिळणार, अशी शक्यता वर्तवण्यात आली. तर त्यानंतर ही चौकशी एसआयटीकडे जाण्याचीही शक्यता माध्यमांच्या तर्कानुसार वर्तवण्यात आली होती. मात्र, या प्रकरणावर आता खुद्द शरद पवार यांनीच प्रतिक्रिया दिली आहे.

बैठकीनंतर शरद पवार म्हणाले, आम्ही अस्वस्थ आहोत. गेले अनेक दिवस नक्षलवादाच्या नावाखाली अटक केली जात आहे हे योग्य नाही.

पवार म्हणाले, आम्ही या प्रकरणाचा आढावा घेतला. या प्रकरणाची चौकशी NIA करतेय; पण या सरकारला काही अधिकार आहेत. त्या अनुषंगाने काय करता येईल याबाबत तज्ज्ञांची आम्ही मतं घेत आहोत. भीमा कोरेगावचा तपास आम्हाला वाटतं योग्य दिशेने सुरू नाही. त्यामुळे त्याचा विचार झाला पाहिजे.

तसेच पवार म्हणाले, माझी मुख्यमंत्र्यांबरोबर याबाबत बैठक झाली नाही. या विषयावर लवकरात लवकर तोडगा काढला जावा ही राज्य सरकारची इच्छा आहे, असे शरद पवार म्हणाले.

शरद पवार यांनी गुरुवारी महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाली आणि पुढच्या कामाची दिशाही ठरविण्यात आली असल्याचेही पवार यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER