राज्यात 1रुपयात संपूर्ण आरोग्य चाचणी योजना लवकरच सुरु करणार : राजेश टोपे

Rajesh Tope

मुंबई : शिवसेनेच्या जाहिरनाम्यातील 1 रूपयात संपूर्ण आरोग्य चाचणी लवकरच अंमलात आणण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्याच्या आरोग्य विभागाला दिशा देण्याचे काम करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने ठरवून दिलेले उद्दिष्ठ गाठण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. सामान्य मानसाला हे शासन आपले वाटले पाहिजे याचा प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. त्याचप्रमाणे राज्यात प्रशानाची अडचण आहे. स्टाफची कमतरता आहे. त्यामुळे ते कसे मॅनेज करता येईल याकडे लक्ष देण्यात येणार असल्याचे टोपे म्हणाले. राज्याचे मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांच्या योजना प्रभावीपणे राबविण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे ते म्हणाले.