नाशिकमध्ये जोरदार पाडापाडी आता भाजपचे दोन मोठे नेते शिवसेनेच्या गळाला

Shivsena & BJP

मुंबई : नाशिकमध्ये भाज – शिवसेनेत जोरदार पाडापाडीचे राजकारण दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच बाजपने शिवसेनेला धक्का दिल्यानंतर आता शिवसेनेने (Shiv Sena) भाजपला दणका दिला आहे. नाशिकमधील भाजपचे दोन मोठे नेते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

माजी आमदार वसंत गिते (Vasant Gite) आणि भाजपचे (BJP) प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल (Sunil Bagul) हे शिवसेनच्या वाटेकर असल्याचं सांगण्यात येतंय. या दोन्ही नेत्यांनी मुंबईत वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याची माहिती विश्वनिय सूत्रांनी दिली असल्याचे वृत्ता महाराष्ट्र टाईम्सने दिले आहे.

वर्षा बंगल्यावर वसंत गिते आणि सुनील बागुल यांची मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. या बैठकीला

नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे आणि युवासेनेचे नेते वरून सरदेसाई देखील होते, असं सांगितलं जातंय. सुनील बागुल आणि वसंत गिते हे दोन्ही नेते पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आहेत.

नाशिकचे माजी आमदार बाळासाहेब सानप (Balasaheb Sanap) यांनी गेल्या महिन्यात २१ डिसेंबरला भाजपमध्ये प्रवेश केला. सानप हे आधी भाजपमध्येच होते. पण भाजपला रामराम करत ते राष्ट्रवादीत गेले. त्यानंतर ते शिवसेनेत गेले. बाळासाहेब सानप हे स्वगृही परतल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आणखी काही नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा केला होता.

माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भाजपमध्ये प्रवेश केला. आता सिवसेनेनेही भाजपला धक्का देण्याची तयारी जोरदार तयारी केलेली आहे असे दिसते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER