नागपुरात शिवसेनेकडून काँग्रेसला जबर धक्का, अनेक बडे स्थानिक नेते शिवसेनेत

नागपुरात शिवसेनेकडून काँग्रेसला जबर धक्का, अनेक बडे स्थानिक नेते शिवसेनेत

नागपूर :- काँग्रेसचे (Congress) माजी मंत्री सतिश चतुर्वेदी (Satish Chaturvedi) यांनी आपल्या मुलाच्या भविष्यासाठी शिवसेनेला (Shiv Sena) जवळ केले आहे. काँग्रेसमध्ये कुठलाही सन्मान मिळत नसल्याने त्यांनी मुलगा दुष्यंत चतुर्वेदी याला शिवसेनेत पाठवले. आणि लागलीच विधानपरिषदेची आमदारकीही मिळवून दिली. त्यानंतर आता त्यांच्याकडून काँग्रेसला सुरुंग लावण्यास सुरुवात केली आहे. दुष्यंत चतुर्वेदी शिवसेनेचे नागपूर प्रभारी झाल्यानंतर त्यांनी वडिलांच्या मदतीनं शहरातील काँग्रेस फोडण्यास सुरुवात केली. नुकतंच सतिश चतुर्वेदी यांचे खंदे समर्थक आणि काँग्रेसचे माजी नगरसेवक दिपक कापसे यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेतं प्रवेश केला आहे.

काँग्रेसचे माजी नगरसेवक दिपक कापसे (Deepak Kapse) यांच्यासह तीन मोठ्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यात नाना झोडे, श्रीकांत कैकाडे, हरिश रामटेकेंचा समावेश आहे. नागपूर शहरातील चार प्रमुख नेत्यांसह जवळपास २०० ते २५० कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेचे माध्यम समन्वयक नितीन तिवारींच्या उपस्थितीत या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे पुन्हा एकदा नागपुरात काँग्रेस आणि शिवसेनेत वाद होण्याची शक्यता आहे. सतिश चतुर्वेदी नागपुरातील काँग्रेसचं मोठं नावं होतं. त्यांच्याकडे कार्यकर्त्यांचीही मोठी फळी होती. तेच कार्यकर्ते आता मुलाच्या भविष्यासाठी शिवसेनेत पाठवले जात आहेत. पण वडिलांच्या कार्यकर्त्यांच्या भरवशावर नागपुरात आमदार दुष्यंत चतुर्वेदी सेनेला उभारी देणार का? हाच मोठा प्रश्न आहे.

कारण शिवसेनेचे माजी खासदार प्रकाश जाधव, माजी उपजिल्हाप्रमुख चिंटू महाराज यांच्यासह सेनेतील अनेक जुने नेते दुष्यंत चतुर्वेदी यांच्यावर नाराज असल्याची चर्चाही रंगली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER