देशात आहे तेच वातावरण महाराष्ट्रात, भाजपाच निवडून येईल; देवेंद्र फडणवीस यांचा दावा

Devendra Fadnavis.jpg

नांदेड :- देशात जे वातावरण आहे तेच महाराष्ट्रात आहे. राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपाचेच उमेदवार निवडून येतील, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला. ते नांदेडमधील प्रचार मेळाव्यात बोलत होते.

मराठवाडा आणि विदर्भाचा मागासलेपणा दूर करण्यासाठी भाजपा उमेदवाराला निवडून द्या. मराठवाडा / विदर्भ वैधानिक विकास मंडळ बंद करण्याचा निर्णय या सरकारने घेतला आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांनी यावर आक्षेप तरी घेतला का? असा प्रश्न फडणवीस यांनी विचारला. (BJP will win in graduate constituency election 2020)

देवेंद्र फडणवीस यांनी वीज बिल, मराठा आरक्षणासह इतर मुद्द्यांवरून महाविकासआघाडी सरकारवर टीका केली. लॉकडाऊनच्या काळात भरमसाठ वीज बिले आली. पण वीज वापरलीच नाही तर त्याचे बिल का भरणार? त्यामुळे ही निवडणूक सरकारला शॉक देण्याची निवडणूक आहे, असे ते म्हणाले.

हायकोर्टात कमावले ते सुप्रीम कोर्टात गमावले

आमच्या सरकारच्या काळात ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले. पण या सरकारला ते टिकवता आले नाही. या सरकारमध्ये समन्वयाचा अभाव आहे. आपण जे हायकोर्टात कमावले ते सुप्रीम कोर्टात गमावले. राज्य सरकारने मराठा आणि ओबीस समाजाला समोरासमोर उभे करु नये, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

भाजपा, महाविकास आघाडी, मनसेच्या उमेदवारांविरुद्ध तक्रार

विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजपा, मनसे आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार पुणे येथील वकील अभिषेक हरिदास यांनी केली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड, भाजपाचे संग्राम देशमुख आणि मनसेच्या रुपाली पाटील या तीन उमेदवारांनी निवडणूक आयोगाला खोटी माहिती पुरवल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

ही बातमी पण वाचा : आता पहाटे नाही तर योग्य वेळीच शपथ दिसेल : देवेंद्र फडणवीस

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER