महाभारतात भीष्म यांना मारण्यासाठी शीखंडीला समोर केलं होतं, तसं आता भाजपनं कंगनाला पुढं केलं – शिवसेना

राज्यपालांनी कंगनाला वेळ देण्यापेक्षा समस्यांवर लक्ष द्यावं

hemant Patil & BJP

मुंबई : मागील काही दिवसांपासून अभिनेत्री कंगना (Kangana Ranaut) विरुद्ध शिवसेना (Shivsena) असा वाद उफाळला आहे. त्यातच मुंबईत येण्यापूर्वी कंगनाला केंद्राने वाय प्लस सुरक्षा पुरवणे, भाजप नेत्यांनी कंगनाच्या समर्थनार्थ वक्तव्य करणे यावरून भाजपची कंगनाला साथ असल्याची टिप्पणी सत्ताधारी शिवसेना नेते करत आहेत. एवढेच नाही तर, शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील (Hemant Patil) यांनी जी चोवीस तासशी बोलताना भाजपवर थेट आरोपच केले आहे.
ते म्हणाले, महाभारतात जसं, भीष्म यांना मारण्यासाठी शिखंडीला समोर उभं केलं होतं, तसंच कंगनाला भाजपनं पुढे केलं असल्याचा आरोप शिवसेना खासदार हेमंत पाटील यांनी केला आहे.

पूढे ते हेदेखील म्हणाले की, नाचगाणं करणा-या महिलेला पुढे करून राजकारण केलं जात आहे. एवडेच नाही तर हेमंत पाटील यांनी राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांच्यावरही खोचक टिप्पणी केली आहे. राज्यपाल-कंगना दोघांनाही काम नाही. राज्यपालांनी कंगनाला वेळ देण्यापेक्षा समस्यांवर लक्ष द्यावं असे विधान हेमंत पाटील यांनी केले आहे.

दरम्यान, मुंबईत आपल्याला सतत धमक्या व घाबरवण्याचा प्रयत्न होत आहे. मुंबई आता असुरक्षीत असल्याचे सांगत कंगना आज तिच्या स्वगावी चंदिगडला पोहचली आहे. चंदिगडला पोहचल्यानंतरही कंगनाने शिवसेनेवर टीका करणे सुरूच ठेवले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER