चण्याचे उत्पादन वाढले, पण भाव मिळेना; आयातीचा धसका

Pulses farmers are set to harvest a record chana crop, but their party could be spoiled by imports.

लातूर :- या वर्षी २०१९ – २० मध्ये देशात चण्याचे ११.२२ दशलक्ष टन उत्पादन होणार आहे. गेल्या वर्षी ९.९४ दशलक्ष टन उत्पादन झाले होते. चण्याचे विक्रमी उत्पादन २०१७ – १८ मध्ये ११.३८ दशलक्ष टन झाले होते. मात्र या उत्पादनवाढीमुळे आनंदी होण्याऐवजी शेतकरी चण्याला भाव मिळणार की नाही या काळजीत आहेत. कारण, सरकार चणा आयात करू शकते; या स्थितीत चण्याचे दर वाढण्याची शक्यता नाही. याशिवाय सरकारकडे चण्याचा मोठा साठा पडून आहे.

नाफेडकडे १७ फेब्रुवारीला असलेल्या डाळींच्या साठ्यात १५.८३ लाख टन चणा आहे. या संदर्भात उल्लेखनीय आहे की, मराठवाडा आणि विदर्भ या दुष्काळसदृश भागात चणा हे रब्बीचे महत्त्वाचे पीक आहे. खरिपातील सोयाबीनचे पीक आल्यानंतर  (ऑक्टोबरनंतर) जमिनीतील ओलाव्यावर चण्याचे पीक घेतले जाते.

४४ हजार शेतकऱ्यांना मिळणार शेतातील मातीची आरोग्यपत्रिका

याला एक पाणी (एक वेळ सिंचन) पुरेसे असते. गव्हाला मात्र तीन किंवा चार पाण्याची गरज असते. या वर्षी झालेल्या, पावसाळ्यातील उत्तरार्धात ऑगस्ट–सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे नोव्हेंबरमध्ये जास्त क्षेत्रावर चण्याची पेरणी झाली. मराठवाड्यातील लातूर परिसरात या वर्षी खरिपाच्या हंगामात पाऊस कमी झाला. अनेक शेतकऱ्यांनी पेरणीच केली नाही. अशा शेतकऱ्यांनी या वर्षी चण्याचे पीक घेतले. एवढेच नाही तर ज्यांचे सोयाबीनचे पीक हातचे गेले अशाही काही शेतकऱ्यांनी ऑक्टोबरच्या अखेर सोयाबीनच्या पिकावर नांगर फिरवून चण्याचे पीक घेतले.