कोल्हापुरात मुख्य सचिवांची प्रतिमा पंचगंगेत बुडवली

कोल्हापुरात मुख्य सचिवांची प्रतिमा पंचगंगेत बुडवली

कोल्हापूर : कोल्हापुरात कोरोना (Corona) संसर्गाच्या उपचाराअभावी अनेक बाधितांना प्राण गमवावा लागत आहे. रुग्ण संख्या वाढल्याने हॉस्पिटल कमी पडत आहेत. म्हणून सी.पी.आर. हॉस्पिटलला लागून असणाऱ्या जिल्हा न्यायालयाच्या वापराविना असणाऱ्या जुन्या इमारती कोरोना संसर्गाच्या काळात सी.पी.आर.हॉस्पिटल्स् ऑक्सीजनसुविधेच्या उपचार केंद्रांसाठी द्याव्यात अशी मागणी आहे. पण शासनाचे आडमुठे धोरण घेतले. मुख्य सचिव संजय कुमार (Sanjay Kumar) यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून या इमारतीबाबत प्रस्ताव पाठवू नये असे आदेश दिले.

त्यामुळे संतापलेल्या कोल्हापूरकरांनी आज पंचगंगा नदीत (Panchganga River) संजय कुमार यांच्या प्रतिमा सोडून निषेध व्यक्त केला. तसेच संजय कुमार यांनी दिलेल्या आदेशाची प्रत नदीच्या वाहत्या पाण्यात बुडवली. यावेळी कार्यकर्त्यांनी शासन आणि संजयकुमार यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. यावेळी सर्वपक्षी कृती समितीचे अशोक पोवार, रमेश मोरे, दिलीप देसाई, अंजुम देसाई, संभाजी जगदाळे, बाबा देवकर, सुभाष देसाई ,विनोद डूणूंग आदी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैणात करण्यात आला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER