कोल्हापुरात 768 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह

Corona Negative

कोल्हापूर :- कोल्हापूर जिल्ह्याला गेले काही दिवस चिंता वाढवणाऱ्या बातम्या येत आहेत. या पार्श्वभूमीवर आज मंगळवारची सकाळ दिलासादायक बातमी घेऊन येणारे आहे. आज आज सकाळी कोरोनाची लक्षणे आढळलेल्या जिल्ह्यातील 768 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. गेल्या काही दिवसात कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाव्हायरसच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होते आहे. काल दिवसभरात 69 रुग्ण वाढल्याने 409 पर्यंत रुग्ण संख्या गेली होती. ही गोष्ट जिल्ह्याची धडकन वाढवणारी आहे. असे असताना काल सोमवार रात्री आठ ते आज मंगळवार सकाळी दहा वाजेपर्यंत 788 लोकांचे अहवाल प्राप्त झाले ते सर्वही निगेटिव्ह आहेत. या अहवालात पैकी 20 अहवाल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संशयितांचे आहे. गेल्या काही दिवसातील कोरोनाव्हायरस चा जिल्ह्यातील आलेख वाढत असताना मंगळवार सकाळ तरी दिलासादायक वृत्त घेऊन आली आहे.


Web Title : In kolhapur reports of 768 persons were negative

(Maharashtra Today : Latest and breaking marathi news from Mumbai City, Nagpur City, Thane City, Pune City, Aurangabad City, Kolhapur City, Sangli City, Ratnagiri City, Nanded City and all other cities of Maharashtra.)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER