कोल्हापुरात आता 25 रुग्णासह 39 पॉझिटिव्ह

Coronavirus - Kolhapur

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोंनाचा प्रसार वाढतोच आहे. आज दुपारी अहवालानुसार जिल्ह्यात आणखी 25 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोना बाधितांचा आकडा 427 वर गेला आहे. जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असल्याने बाधितांचा आकडा 400 पार झाला आहे. बहुतेक जण मुंबई ,पुणे ,सोलापूर अशा रेड झोन परिसरातून आलेले आहेत तर काही व्यक्ती यापूर्वी कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या होत्या अशा सर्वांचे स्वॅब टेस्ट कोरोना पॉझिटिव्ह आलेले आहेत. अशी माहिती वैद्यकीय यंत्रणेने दिली आहे.

गेल्या १४ दिवसांत सतत कोरोनाग्रस्तांची वाढलेली संख्या कमी होत आहे. दिवसभरात १९ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्या, तर ५७३ व्यक्तींचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले. आजवर ३९ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. जिल्हाभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता ४२७ झाली असून मुंबई, पुणे, सोलापूर भागातून जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी आलेल्या व्यक्तींची तपासणी गेल्या काही दिवसांत सुरू आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER