कोल्हापुरात भाजपने केला सरकारचा निषेध

BJP-Chandrakant Patil

कोल्हापूर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी शुक्रवारी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आम.चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली “माझे आंगण माझे रणांगण” या घोषणेचा आधार घेऊन घरा-घरामध्ये आंदोलन छेडण्यात आले आहे. भाजपा कोल्हापूर महानगरच्यावतीने देखील या सरकारचा निषेध करण्यासाठी सात मंडलाच्या माध्यमातून आपल्या घराच्या दारात उभा राहून व्यक्त केला. भाजपा युवा मोर्च्याच्यावतीने छत्रपती शिवाजी चौक, बालेकील्ला तरुण मंडळ, कळंबा फिल्टर हाउस चौक, मिरजकर तिकटी, हैदर रोड, डोर्ले कॉर्नर, शाहू मील चौक, कोंडा ओळ, खोल खंडोबा परिसर याठिकाणी निषेध करण्यात आला.

“माझे आंगण माझे रणांगण” या आंदोलनामध्ये महाराष्ट्र भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी तसेच सर्व भाजपा नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी आप-आपल्या घरी कुटुंबासहीत अंगणामध्ये उभे राहून सरकारचा जाहीर निषेध केला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER