केरळमध्ये राष्ट्रवादीचे दोन उमेदवार विजयी, पवारांच्या मोहऱ्याने भाजप उमेदवाराला लोळवले

Thomas K Thomas - Sharad Pawar

मुंबई : केरळसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. केरळ विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने तीन उमेदवार उतरवले होते. या तीन उमेदवारांपैकी दोन उमेदवार विजयी झाले आहे. विशेष म्हणजे शरद पवारांचे खास विश्वासू विद्यमान आमदार आणि वाहतूक मंत्री ए के शशीधरन पुन्हा एकदा इलाथूर विधानसभा मतदारसंघातून रिंगणात उतरले होते. त्यांनी जोरदार मुसंडी मारत विजय मिळवला आणि भाजप उमेदवार टी पी जयाचंद्रन मास्टर हे तिसऱ्या स्थानावर फेकले गेले.

तर कुट्टुनाड मतदार संघातून के थॉमस यांनी केरळ काँग्रेसचे उमेदवार जेकब अब्राहम यांना धूळ चारली आहे. तर एका उमेदवाराचा पराभव झाला आहे. केरळमध्ये विजयी झालेल्या उमेदवारांचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी अभिनंदन केले आहे. तसेच केरळ विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या यशात महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याबद्दल आमचे ज्येष्ठ नेते श्री पी. सी. चाको यांचे अभिनंदन. मला खात्री आहे की भविष्यात राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बळकटीकरणासाठी ते आपले योगदान देत राहतील, असे शरद पवार म्हणाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button