काश्मीरमध्ये पुन्हा फक्त ‘२जी’ इंटरनेट सेवा

2G Internet Connection

श्रीनगर :- गंडेरबाल आणि उधमपूर या दोन जिल्ह्यांचा अपवाद वगळता संपूर्ण जम्मू-काश्मीरमध्ये इंटरनेट टेलिकॉम सेवांचा (Internet telecom services ) वेग येत्या २६ नोव्हेंबरपर्यंत  ‘२जी’ (2G internet service) इतका मर्यादित ठेवण्याचा आदेश या केंद्रशासित प्रदेशाच्या गृह खात्याने काढला आहे.

काश्मीरमध्ये सध्या जिल्हा परिषदा, नगर परिषदा व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू आहे. सरकारचा आदेश म्हणतो की, लोकांनी या निवडणुकांमध्ये भाग घेऊ नये यासाठी भीती घालण्यासाठी ठरवून हत्या करण्याच्या घटना गेल्या १५  दिवसांत घडल्या आहेत. दहशतवाद्यांच्या या कारवायांना इंटरनेटने बळ मिळते म्हणून त्याच्या वेगावर मर्यादा घालण्यात आल्या आहेत.

हे निर्बंध फक्त ‘प्री-पेड’ पद्धतीने मोबाईल सेवा घेणाऱ्यांना लागू होतील. ‘पोस्ट-पेड’ ग्राहकांना ‘मॅक बाइंडिंग’ करून नेहमीप्रमाणे सेवा पुरविल्या जातील.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER