
मुंबई : कल्याण-डोंबिवलीत ( Kalyan-Dombivali) मनसेला (MNS) आणखी एक मोठा झटका बसला आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते आणि गटनेते मंदार हळबे यांनी आज प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये (BJP)प्रवेश केला.
मनसेसाठी हा मोठा धक्का आहे. कालच ( सोमवारी ) सायंकाळी डोंबिवलीतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी शहराध्यक्ष तसेच प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत शिवसेनेत प्रवेश केला आहे. राजेश कदम, मंदार हळबे यासारख्या नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देणे, हा मनसेसाठी एक मोठा धक्का आहे. कल्याण-डोंबिवलीत मनसेचा विस्तार आणि जनाधार वाढवण्यात या दोन्ही नेत्यांची महत्त्वाची भूमिका होती. राज ठाकरे यांच्या विश्वासातील नेते म्हणूनही ते ओळखले जायचे.
या नेत्यांनी मनसे का सोडली हे अजून स्पष्ट होऊ शकलेले नाही. पण कल्याण-डोंबिवलीत मनसे अंतर्गत सर्वकाही ठीक-ठाक नसल्याचे यावरून स्पष्ट होते. राजेश कदम हे स्थापनेपासून मनसेसोबत होते. मंदार हळबे यांनी २०१९ मध्ये मनसेच्या तिकीटवर डोंबिवलीतून विधानसभेची निवडणूक लढवली होती. भाजपच्या रवींद्र चव्हाण यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला