हातकणंगल्यात जयंत पाटलांनीच राजू शेट्टींचा ‘करेक्ट कार्यक्रम’ केला?

Jayant Patil & Raju sheeti

राजू शेट्टींनी राष्ट्रवादीची विधान परिषदेची ऑफर स्वीकारायची की नाही यावर स्वाभिमानी शेतकरी संघटेनत भरपूर चर्चा झाली. कुणी – कुणाचे ऐकायला तयार नव्हते; पक्ष फुटतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. हातकणंगल्यात चर्चेची अनेक गुऱ्हाळ झाल्यानंतर राजू शेट्टींनी शेवटी विधान परिषदेची ऑफर नाकारली.

या सगळ्यात पुन्हा कार्यकर्त्यात अन् हातकणंगल्याच्या चौकाचौकात चर्चा रंगली होती, राजू शेट्टींनी राष्ट्रवादीसोबत जाऊ नये. आज महाविकास आघाडी सोबत असणाऱ्या राजू शेट्टींनी एक काळ राष्ट्रवादी विरोधात गाजवला. ऐवढंच नाही तर राष्ट्रवादीच्या सरंजामदार साखर कारखानदारांविरोधात आंदोलन करुनच शेट्टींचे राजकारण उभे झाले.

एकच गट्टी, राजू शेट्टी

साखर खायाला जितकी गोड लागते तिचा इतिहास अन् वर्तमान महाराष्ट्रात तितकाच कडू आहे. कोल्हापूर ऊस उत्पादनात अग्रेसर. पाऊस असा सपाटून पडतो की तिथं इतर पिकं घेता येत नाही. म्हणून ऊसाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्याला त्याच्या मेहनतीचाही पैसा मिळायचा नाही; त्यात आणखी साखर कारखानदारांची दंडेली.

शरद जोशींनी सुरू केलेल्या शेतकरी संघटनेतून या साखर कारखानदारांची दहशत धुडकावून लावणारा एक तरुण पुढे आला त्याचे नाव राजू शेट्टी.

दुधाला आणि ऊसाला योग्य भाव द्या नाहीतर साखर कारखाना चालू देणार नाही, असे राजू शेट्टींनी म्हणायचे आणि दुसऱ्या दिवशी कारखान्याला कुलुप! मग तो आमदाराचा असू दे, खासदाराचा असू दे की मंत्र्यांचा! झडप व्हायची. पोलिसांना सांगूण आंदोलन दाबण्यासाठी लाठीमार व्हायचा. या आंदोलनात राजू शेट्टींनी तोंडातून रक्त पडेपर्यंत मार खाल्ला. पश्चिम महाराष्ट्रात सहकारी साखर कारखाना म्हणजे राष्ट्रवादीचा गड, त्यांना विरोध करत राजू शेट्टींचे नाव मोठ्ठ झाल. नेता कितीही बडा असला तरी, अंगावर आला की अंगावर अन् शिंगावर आला तर शिंगावर घ्यायची तयारी असलेला हा पैलवान गडी आहे.

ऊसाला ६०० ते ७०० रुपये टन मिळणारा दर आज ३ हजारांच्या घरात आहे तो फक्त राजू शेट्टीमुळेच ! राजू शेट्टी मनात आहे तेच बोलतो आणि जे बोलतो तेच करतो, हे लोकांना समजले आणि राजू शेट्टींना अक्षरशः हातकणंगले तालुक्याने डोक्यावर घेतले. जेव्हा राजू शेट्टी प्रचाराला बाहेर पडायचे तेव्हा मतदार संघात एकच घोष होता – “एकच गट्टी राजू शेट्टी.”

पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आमदार आणि खासदार अशा सलग निवडणूकात राजू शेट्टी निवडूण आले. मराठा बहुल मतदार संघात अल्पसंख्याक जैन समाजाचा मुलगा खासदार झाला. हे घडले ते शेतकऱ्यांसाठी उभारलेल्या लढ्यामुले आणि पर्यायाने राष्ट्रवादीच्या सरंजामशाहीला केलेल्या विरोधामुळे.

इथ डाव गंडला

आता तुमाला वाटेल की जलसंधारण मंत्री जयंत पाटील सांगलीचे अन् राजू शेट्टी कोल्हापूरचे, त्यांचा नेमका संबंध काय ? तो असा, कोल्हापूर जिल्हाचा निम्मा अन् सांगली जिल्ह्याचा निम्मा भाग मिळून हातकणंगले लोकसभा मतदार संघ बनतो. जयंत पाटलांचा विधानसभा मतदार संघ याच लोकसभा मतदार संघात येतो.

जयंत पाटलांच्या कारखान्याने ऊसाला योग्य दर द्या या मागणीसाठी राजू शेट्टीं नेहमी आंदोलन करायचे. अनेकदा खटके उडायचे. स्वाभिमानी शेतकरी संघटना ऊस दरवाढ आंदोलनावेळी ऊसवाहून नेणाऱ्या वाहणांचे नुकसान करायचे; तोडफोट करायचे यामुळे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांवरशेकडो केसेस झालेल्या. अशात राजू शेट्टी पडावे म्हणून पूर्ण जोर लावणाऱ्या किंगमेकर जयंत पाटलांना राजू शेट्टींचा पराभव करता आला नाही. पण २०१९ नंतर सगळच बदलल.

आयुष्यभर ज्यांच्या विरोधात प्रचार केला त्यांनाच प्रचाराला सोबत घेवून राजू शेट्टी मतदार संघात फिरत होते. त्यामुले म्हणा किंवा जयंत पाटलांनी निवदेता माने वहिनी, कलाप्पा आण्णा आवाडे यांचा प्रचार हातकणंगल्यात केला त्यांचा राजू शेट्टींनी धुव्वा उडवला होता. जयंत पाटील हातकणंगल्यात ज्याचा प्रचार करतात तो कधीच निवडणून येत नाही असा काही लोकांचा समज होता. त्याला पुन्हा बळ मिळेल अशी परिस्थिती निर्माण झाली पण, या वेळी जयंत पाटिलांचे हातकणंगल्यात ‘बॅडलक’ राजू शेटींना भोवले.

ज्या राष्ट्रवादीच्या नेत्यांविरोधात आंदोलन केली.. संघर्ष केला. कार्यकर्त्यांनी अंगावर केसेस घेतल्या.. कोर्ट – कचेऱ्या केल्या. त्याच जयंत पाटलांच्या पाठिंब्यावर राजू शेट्टी उभे राहिलेत हे राजू शेट्टींच्या चाहत्यांना पटले नाही; त्यामुळे लोकांनी राजू शेट्टींना पाडले असे कार्यकर्ते म्हणतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER