गुजरातमध्ये फक्त खासगी इमारतींवरूनच पतंगबाजी

अहमदाबाद: गुजरातमध्ये संक्रांतीला साजºया केल्या जाणाºया ‘उत्तरायण सणा’वरही यंदा कोरोनामुळे (Corona) बंधने आणली आहेत. एरवी या दिवशी जागा मिळेल तेथून पतंग उडविले जातात व पतंगबाजीच्या (kite flying) स्पर्धाही होतात. विदेशी पर्यटकही ते पाहण्यासाठी मोठ्या संख्येने येत असतात. पण यंदा राज्य सरकारने कोरोनाचे सर्व निर्बंध पाळून पतंगबाजीला परवानगी दिल्याने एरवी निनाविध आकार-प्रकाराच्या एकाचवेळी उडणाºया हजारो-लाखो पतंगांनी गजबजून जाणारे गुजरातचे आकाश यंदा काहीसे फिके झाले आहे.

गुजरातमध्येही यंदा हा सण साजरा करू न देण्याचा विषय उच्च न्यायालयात गेला होता. परंतु सरकारने फक्त पतंग उडवायला परवानगी देणारे व अन्य कोणत्याही प्रकारच्या धांगड-धिंग्यास बंदी घालणारे नियम केले. ते मान्य करून न्यायालयानेही बंदीचा आग्रह धरला नाही. खासगी इमारतींच्या गच्ची किंवा छतावरून फक्त त्याच इमारतीमध्ये राहणार्‍या लोकांना पतंग उडविण्यास परवानगी देण्यात आली. रस्ते व मैदानांवर पतंगबाजीला पूर्ण मज्जाव केला गेला.

रायपूर, टंकसाल व नरोडा यासारखे पतंग आणि मांंज्याचे बाजार याही वर्षी गजबजले. पण गर्दी कमी होती व ‘सोशल डिस्टन्सिंग’ आणि तोंडाला मास्क या नियमांचे पालन कसोशीने होईल यासाठी पोलीस सतर्क होते. कोरोनाचा फटका बसलेल्या व्यापार-उदिमास तशीही पतंगबाजीवर पूर्ण बंदी परवडणारी नव्हतीच. फक्त संक्रांतीच्या निमित्ताने पतंग आणि मांज्याच्या बाजारपेठेत ६०० कोटी रुपयांची उलाढाल होत असते. सुमारे १.२५ लाख कुटुंबांचा वर्षभराचा चरितार्थ यावरच चालतो.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER