गोंदियात राष्ट्रवादीला काँग्रेसचा मोठा दणका

गोंदिया :- गोंदिया (Gondia) जिल्ह्यात काँग्रेसने राष्ट्रवादीविरुद्ध (NCP) फोडाफोडीची मोहीम उघडली आहे. काही दिवसांपूर्वी खा. प्रफुल्ल पटेल यांच्याजवळचे सहकारी गप्पू गुप्ता यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर रविवारी (१ नोव्हेंबरला) राष्ट्रवादीच्या आजी – माजी ४८ पदाधिकाऱ्यांनी विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

Nana Patoleनाना पटोले (Nana Patole) आणि प्रफुल्ल पटेल हे जिल्ह्यातील प्रमुख राजकीय प्रतिस्पर्धी आहेत. नाना पटोले यांनी पटेलांना लोकसभेच्या निवडणुकीत एकदा पराभूत केले आहे. पटोले यांची ताकद  वाढत गेली तर ते पुन्हा लोकसभेच्या निवडणुकीत पटेल यांना आव्हान देऊ शकतात. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये (Congress) प्रवेश हा राष्ट्रवादी पक्षाप्रमाणे पटेल यांनाही मोठा धक्का आहे.

पटेल यांनी या कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकऱ्यांचा गळतीची दखल घेतली आहे. ते जिल्ह्यात दौरा करत कार्यकर्त्यांशी संपर्क करून पडझड रोखण्याचा प्रयत्न करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER