पाच वर्षात देशातील रस्ते अमेरिका-युरोपसारखे होतील; नितीन गडकरींचे आश्वासन

Indian Roads - Nitin Gadkari - Maharashtra Today

नवी दिल्ली : आगामी पाच वर्षांमध्ये देशातील पायाभूत सुविधा अमेरिका आणि युरोपसारख्या होतील. नव्या भारताच्या निर्मितीसाठी एक भक्कम पाया तयार केला आहे. यामध्ये गेल्या पाच वर्षात १७ लाख कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू केले आहे, असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी (Nitin Gadkari) सांगितले आहे.

दिल्लीतील एका कार्यक्रमात गडकरी म्हणाले की, “नव्या भारताच्या निर्मितीसाठी आम्ही एक भक्कम पाया तयार केला आहे, ज्यामध्ये आम्ही मागील ५ वर्षात १७ लाख कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू केले आहेत. देशातील विकासाच्या बाबतीत मागासलेला भाग, पूर्वोत्तर आणि सीमाभागांचा विकास हे सरकारचे सर्वात मोठे लक्ष्य आहे. ग्रीन एक्सप्रेस वे कॉरीडोरचे नेटवर्क पूर्णपणे सज्ज आहे. ज्यात दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे आणि ३० किमी द्वारका द्रुतगती मार्गाचा समावेश आहे.”

देशातील सर्व प्रकल्पांवर १० हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा अभियांत्रिकीचा एक अप्रतिम नमुना असेल. प्रकल्प प्रत्यक्षात आल्यानंतर दिल्ली बॉर्डर सिंगापूरसारखी दिसेल. सीमेवरील रस्ते बांधण्याचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. या ठिकाणी ऑस्ट्रेलिया टनेल मॉडेल पद्धतीने काम केले जात असल्याचेही गडकरी म्हणाले.

Green Highways वर सरकार ७ लाख कोटी खर्च करणार
अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्रीन एक्सप्रेस हायवेच्या बांधकामावर सरकार ७ लाख कोटी रुपये खर्च करीत आहे. या Green Express Highways मुळे देशातील परिवहन अधिक स्मार्ट होईल. त्याचबरोबर प्रदूषणाची पातळी कमी होण्यास मदत होईल. पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्सने डिजिटल पद्धतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात गडकरी बोलत होते.

दिल्ली-मुंबई कार प्रवास १२ तासांत
गडकरी म्हणाले की, “पंतप्रधानांनी राष्ट्रीय पायाभूत सुविधा पाईपलाईन अंतर्गत १११ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणूकीचे लक्ष्य ठेवले आणि हरित दृष्टीकोन स्वीकारून सरकार पर्यावरणाला हानी न पोहोचवता विकास करण्याचा प्रयत्न करीत आहे. २२ ग्रीन हायवे कॉरिडोरपैकी दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर दोन महानगरांदरम्यान कारने प्रवास करण्याचा वेळ कमी केला जाईल. हा प्रवास १२ तासांमध्ये होऊ शकेल, सध्या हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ४० तास लागतात.

दरम्यान, आगामी पाच वर्षांत टोल वसुली आणि राष्ट्रीय महामार्गांच्या हस्तांतरणाद्वारे बाजारपेठेतून १ लाख कोटी रुपये उभे करण्याची योजना आखत असल्याचे गडकरींनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER