दिल्ली हिंसाचारातील मृतांचा आकडा २५ वर, १८ जणांवर गुन्हे, १०६ जणांना अटक

Delhi Violence

नवी दिल्ली : दिल्लीत मागील चार दिवसांपासून सुरु असलेल्या हिंचाचारात आतापर्यंत 25 जणांना आपले प्राण गमवावे लागले असून दोनशेच्यावर लोक जखमी झाले आहे. तर हिंसाचार घडवून आणणा-या18 संशयितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तर 106 जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान आज गुरु तेग बहादूर रुग्णालयात आज तीन गंभीर जखमींचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक सुनीलकुमार यांनी सांगितले.

हिंसाचाराच्यावेळी या भागात घरांच्या छतावरुन दगडफेक करण्यात आली होती. ज्या लोकांनी दगडफेक केली त्यांच्याविरोधात पुरावे मिळलतील त्यानंतर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे दिल्लीचे पोलीस प्रवक्ते एम. एस. रंधवा यांनी सांगितले. दिल्लीच्या संवेदनशील भागात आता ड्रोनच्या माध्यमातून लक्ष्य ठेवले असून छतांची पाहणी केली जात आहे.

वर्षा गायकवाड काकोडकर, भटकर, वांगचुक यांच्यापेक्षा बुद्धिमान आहेत का : विनोद तावडे

या प्रकरणी आत्तापर्यंत १८ जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला असून १०६ जणांना अटक करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने हिंसाचार करणाऱ्यांची ओळख पटवली जात असून त्यानुसार त्यांच्यावर कारवाई होईल, असेही रंधवा यांनी स्पष्ट केले.

सध्या दिल्लीतील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून कोणालाही घाबरुन जाण्याची गरज नाही. ज्याना कोणतीही तक्रार करायची असेल तर ते ११२ या हेल्पलाईनवर संपर्क करु शकतात. दरम्यान, त्यांनी जनतेला अफवा न पसरवण्याचही आवाहनही रंधावा यांनी केले आहे.