दिल्लीत सीएए विरोधी आंदोलन हिंसक, दगडफेकीत हेड कॉन्स्टेबलचा मृत्यू

Anti-CAA agitation

नवी दिल्ली : सीएए आणि एनआरसीवरून दिल्लीतील मौजपूरजवळ विरोधक आणि समर्थकांत झालेल्या दुफान दगडफेकीत एक पोलिस कॉन्स्टेबल मृत्यूमुखी पडल्याचे समोर आले आहे. रतनलाल असे या मृत पोलिस कॉन्स्टेबलचे नाव असल्याचे दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केले आहे. शिवाय 37 पोलिस जखमी झाले आहेत. यात पोलिस उपायुक्त अमित शर्मा यांचाही समावेश आहे. हिंसेच्या घटनेनंतर पोलिसांनी उत्तर-पूर्व दिल्लीत दहा ठिकाणी कलम 144 आणि संचारबंदी लागू केली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यसाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडाव्या लागल्या.

आंदोलकांनी दिल्लीच्या उत्तर-पूर्व दिल्लीच्या जाफराबाद आणि मौजपूर परिसरातकाही घरांनाही आग लागली. ज्यामुळे परिसरात तणाव वाढला होता. सलग दुसऱ्या दिवशी या परिसरात सीएए आणि एनआरसीवरुन आंदोलन सुरु आहे. सीएए-एनआरसी समर्थक आणि विरोधक समोरासमोर आल्याने त्याचे रुपांतर हिंसाचारात झाले. दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक केल्याने मोठे तणावाचं वातावरण त्याठिकाणी निर्माण झाले होते.