भाजपमध्ये आणखी नेत्यांचा प्रवेश होणार ; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

Devendra Fadnavis & Eknath Khadse

मुंबई :- ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या राष्ट्रवादीत (NCP) प्रवेशानंतर आणखी भाजप नेते राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू होत्या. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाष्य केले . नाशिकचे शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब सानप (Balasaheb Sanap) यांनी शिवबंधन तोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी बोलत असता देवेंद्र फडणवीस यांनी भाजपमध्ये मेगाभरतीचे संकेत दिले आहेत. भाजपमध्ये अनेकांचा प्रवेश होणार आहे.

मात्र, काही जण उगाचच वावड्या उठवत आहेत की, भाजपचे आमादार आमच्याकडे येणार. अशा वावड्या उठण्याचं एकमेव कारण म्हणजे कुणी त्यांच्याकडे जाणार नाही हे त्यांनादेखील माहिती आहे, असे फडणवीस म्हणाले. पण त्यांच्या  पक्षामध्ये एवढी प्रचंड अस्वस्थता आहे व आमदरांमध्ये एवढी जास्त नाराजी आहे की, हे आमदार काय करतील? अशा प्रकारची भीती मनात असल्यामुळेच त्यांना संकेत देण्यासाठी उगाचच पक्षप्रवेशाच्या वावड्या उठवल्या जात आहेत. दुर्दैवाने त्यांनी उठवलेल्या वावड्या माध्यमांमधीलही काही जण पुढे करतात.

मात्र, चिंता करायची गरज नाही, भाजपचे सर्व आमदार एकत्र आहेत. विशेष उल्लेख करून सांगतो की, विविध पक्षांमधून जे भाजपत आलेले आहेत, ते राजकीयदृष्ट्या अधिक प्रगल्भ आहेत. त्यांनी मोठं राजकारण बघितलेलं  आहे. त्यामुळे त्यांना हे समजते आहे, असेदेखील फडणवीस यांनी बोलून दाखवले. महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) तिन्ही पक्ष आगामी निवडणुका एकत्र लढवतील, असे सांगितले जात आहे. मी म्हणेन त्यांनी नक्कीच एकत्र निवडणूक लढवली पाहिजे, माझी तर तशी इच्छाच आहे, असे वक्तव्य  देवेंद्र फडणवीस यांनी आज केले .

तसेच, आगामी काळात भाजपत अनेकांचा प्रवेश होणार आहे, भाजप सोडून कुणीही जाणार नाही. काही जण उगाचच वावड्या उठवत असल्याचे म्हणत फडणवीस यांनी यावेळी अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.

ही बातमी पण वाचा : शरद पवारसाहेब कधीही चुकीचा निर्णय करणार नाहीत : देवेंद्र फडणवीस 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER