भीमा कोरेगाव प्रकरणी आरोपींना न्यायालयाकडून दिलासा

मुंबई :- मुंबई उच्च न्यायालायने भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोप गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांची अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी शुक्रवारपर्यंत तहकूब करण्यात आल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.

गौतम नवलखा या भामा कोरेगाव प्रकरणातील आरोपीला २ डिसेंबरपर्यंत अटकेपासून अंतरिम संरक्षण उच्च न्यायालयाने मागील सुनावणीदरम्यान दिले होते. तर याच प्रकरणातील सहआरोपी आनंद तेलतुंबडे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जाबरोबर गौतम नवलखा यांच्याही जामीन अर्जावरील सुनावणी २ डिसेंबर रोजी न्या. पी. डी. नाईक यांच्या एकसदस्यीय खंडपीठाने ठेवली होती.

“आता माझ्या सरकारने भीमा कोरेगावप्रकरणातील खोटे गुन्हे मागे घ्यावे” – जितेंद्र आव्हाड

पुण्यातील कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी, २०१८ रोजी झालेल्या जातीय हिंसाचाराप्रकरणी पुणे पोलिसांनी गौतम नवलखा यांच्यासह आनंद तेलतुंबडे, सुधा भारद्वाज, वर्नोन गोन्साल्विस, वरवरा राव, अरुण फरेरा व अन्य काही सामाजिक कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंदविला आहे. या सर्वांवर भारतीय दंडसंहितेसह बेकायदेशीर हालचाली (प्रतिबंध) (यूएपीए) कायद्यांतर्गतही गुन्हा नोंदविण्यात आला आहे.