धुळे: एक हजारांची लाच घेताना तलाठी जाळ्यात

bribe case

धुळे(प्रतिनिधी): शेतीच्या सातबारा उताऱ्यावर बोजा कमी करण्यासाठी एक हजाराची लाच घेताना धुळे जिल्यातील पिंपळनेर येथे तलाठी शरद कोठावदे यांना मंगळवारी दुपारी लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात अटक केली आहे.या कारवाई मुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.