नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे दोघांमध्येही जनतेला राज्याचे भविष्य दिसत नाही; मनसेची टीका

Maharashtra Today

मुंबई :- महाराष्ट्रातील नागरिकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) या दोघांमध्येही राज्याचे भविष्य दिसत नाही, अशी टीका मनसेचे (MNS) नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी पत्रपरिषदेत केली.

पंतप्रधानांना गुजरातच्या पुढे काही दिसत नाही आणि मुख्यमंत्र्यांना मुंबई महापालिकेच्या पुढे काही दिसत नाही, असा टोमणा त्यांनी मारला.

ही बातमी पण वाचा : कोरोनाची लस काय मातोश्रीचा गच्चीवर बनते का? ग्लोबल टेंडरवरून मनसेची शिवसेनेवर मिस्कील टीका

संदीप देशपांडे यांनी कालदेखील मुंबईतील पत्रकारपरिषद घेऊन मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यवर टीका केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तौक्ते चक्रीवादळाच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्रातही यावे म्हणजे ते भारताचे पंतप्रधान आहेत, असे वाटेल. पंतप्रधान येऊन गेले तर उद्धव ठाकरेही महाराष्ट्रात फिरतील, अशा शब्दांत संदीप देशपांडे यांनी शिवसेनेची फिरकी घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यांचे स्वत:च्या राज्यावर प्रेमही आहे. पण आमचे मुख्यमंत्री मुंबईत राहूनही घराबाहेर पडत नाहीत, असा टोमणा त्यांनी उद्धव ठाकरे यांना मारला.

सध्या राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी काहीही केले तरी ते माफ असते. त्याशिवाय इतर कोणत्या पक्षाने काही केले तर ते राजकारण ठरते, असाही टोमणा संदीप देशपांडे यांनी मारला.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही. 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button