बिहार निवडणुकीत राष्ट्रवादीही; शरद पवारांसह हे नेते करणार प्रचार

Sharad Pawar

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जय्यत तयारी केली आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही उतरण्याचा निर्णय घेतला आहे. उमेदवारांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये महाराष्ट्रातून स्वत: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे, खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) तसंच अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश आहे.

राष्ट्रवादीने जाहीर केलेल्या या यादीतील सर्व नेते उमेदवारांच्या प्रचारसभेला संबोधित करतील. राष्ट्रवादीने जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत एकूण ३९ नेत्यांची नावे आहेत. बिहार विधानसभेचा पहिला टप्पा २८ ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. येत्या काही दिवसांतच प्रचारसभांची रणधुमाळी सुरू होणार आहे.
राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांची यादी…

राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांची यादी…

 • शरद पवार
 • प्रफुल्ल पटेल
 • सुनील तटकरे
 • के. के. शर्मा
 • सुप्रिया सुळे
 • नरेंद्र वर्मा
 • राजीवकुमार झा
 • राजेंद्र जैन
 • सच्छिदानंद सिंग
 • ब्रिजमोहन श्रीवास्तव
 • के.जे.जोसेमन
 • डॉ. फौजिया खान
 • धीरज शर्मा
 • सोनिया दुहान
 • शब्बीर अहमद विद्रोही
 • पुष्पेंद्र मलिक
 • नबाव मलिक
 • सीमा मलिक
 • वीरेंद्र सिंग
 • गोविंदभाई परमार
 • चौधरी वेद पाल
 • उमा शंकर यादव
 • एस.पी. शर्मा
 • मुरली मनोहर पांडे
 • राहत कादरी
 • जितेंद्र पासवान
 • ललिता सिंग
 • संजय केशरी
 • इश्तिक आलम
 • अकबर अली
 • मनोज जैस्वाल
 • खुश्रो आफ्रिदी
 • ब्रिज बिहारी मिश्रा
 • शकील अहमद
 • अझहर आलम
 • इंदु सिंग
 • चांद बाबू रहमान
 • चंद्रेश कुमार
 • चंद्रशेखर सिंग

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER