बीड जिल्ह्यात 24 तासांत 3 शेतक-यांच्या आत्महत्या

Farmer-Suicide

बीड :- राज्यात शेतकरी आत्महत्या थांबायचे नाव घेत नसून नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे बीड जिल्ह्यात 24 तासांत 3 शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहे.

बाबासाहेब भांडवकर नावाच्या एका 65 वर्षीय शेतक-याने कर्जाला कंटाळून गळफास घेऊएन आत्महत्या केली. शेतकरी गेवराई तालुक्यातील मौजे सुशी येथील रहिवाशी आहे. दुसरी घटना बीड तालुक्यातील मैंदा येथील आहे. शेतकरी केशव दादाराव मोमीन यांनी सततच्या नापिकीला कंटाळून शेतात कळफास घेऊन आत्महत्या केली. तिसरी घटना माजलगाव तालुक्यातील राजेवाडी येथील 26 वर्षीय तरुण शेतकरी गणेश घुबडे याने घरातील सर्व जण झोपेत असताना आपली जीवनयात्रा संपवली. यातील मुख्य कारण नापिकी आणि कर्जबाजारीपण हेच आहे.

जिल्ह्यातील 150 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी जानेवारीपासून आजपर्यंत तब्बल टोकाचे पाऊल उचले. यात प्रमुख कारण हे कर्जबाजारीपणा, नापिकी, आणि दुष्काळ हेच आहे. शेतकऱ्यांना धीर देण्यात सरकार अपयशी तर ठरत नाही ना? हा प्रश्न निर्माण होत आहे.65 वर्षीय शेतकऱ्याने सततच्या नापिकी व दुष्काळी परिस्थितीला कंटाळून स्व:ताच्या शेतात राहत्या घरासमोरील लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची आज दुपारी घडली.या घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

बाबासाहेब भगवानराव भांडवलकर (वय- 65) या वयोवृद्ध शेतकऱ्याचे नाव आहे. गेवराई तालुक्यात गेल्या दोन तीन वर्षांपासून सर्वत्र दुष्काळी परिस्थिती असून सततच्या दुष्काळी परिस्थितीला व नापिकीला कंटाळून बाबासाहेब भांडवलकर यांनी घरापासून जवळच असलेल्या लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून स्वतःला संपविले. बाबासाहेब हे वारकरी होते दोनच दिवसांपूर्वी आषाढी एकादशीचे पांडुरंगाचे दर्शन करुन परत आले होते. मात्र, सततची नापिकी यामुळे आर्थिक विवंचना होती.असे नातेवाईकांनी सांगितले.