बेळगावात शाळा गर्दीने फुलल्या

School - Coronavirus
Representative Image

बेळगाव : विद्यार्थ्यांच्या नवीन वर्षाची सुरुवात शुक्रवारी शाळेने झाली. सहावी ते दहावी आणि बारावी या सहा इयत्तांचे वर्ग काल, शुक्रवारपासून सुरू झाले. त्यापैकी सातवी आणि दहावीच्या सुमारे 80 टक्के विद्यार्थ्यांनी पहिल्या दिवशी हजेरी लावली. गेल्या मार्चपासून तब्बल नऊ महिने लॉकडाऊनमुळे (Lockdown) घरीच अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांनी शाळेचा पहिला दिवस आनंदाने अनुभवला.

शाळेच्या आवारात प्रवेश करताना तोंडाला मास्क लावण्यास सांगून, हाताला सॅनिटायझर लावून थर्मल स्क्रीनिंग करूनच शाळेत प्रवेश दिला गेला. शाळेत पालकांकडून संमतीपत्र घेण्याचे काम सुरू होते. पालकांच्या संमतीपत्राशिवाय शाळेत विद्यार्थांना प्रवेश दिला जात नव्हता. काही पालकांनी यापूर्वी पत्रे शाळेला दिली होती. 1 जानेवारी रोजी संमतीपत्रे देण्यासाठी पालकांनी शाळांमधून गर्दी केली होती.

शिक्षकांचीही कोरोना (Corona) चाचणी करण्याचे काम पूर्ण झाले असून, काही शिक्षकांचे अहवाल येणे बाकी होते. त्यामुळे त्या शिक्षकांनी गुरुवारी शाळेत हजेरी लावली नाही. 45 मिनिटांचा एक तास याप्रमाणे वेळापत्रक तयार करून अभ्यासक्रम घेण्यात आला. सुरुवातीला दिवसातून अडीच तास शाळा सुरू राहणार आहे. त्यानंतर परिस्थिती पाहून शाळेचा कालावधी वाढविण्यात येणार आहे.

काही शाळांमध्ये केवळ सातवी व दहावीच्या विद्यार्थ्यांना बोलाविण्यात आले होते. अंतर राखून बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. पहिला तास नियोजन करण्यातच निघून गेला. काही शाळांमध्ये सरस्वतीपूजन करून वर्गांना सुरुवात केली. शाळा सुरू होण्यापूर्वी शाळेच्या आवारात सगळीकडे जंतुनाशक फवारणी करण्यात आली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER