
मुंबई : खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी नुकतेच एक ट्विट शेअर करत महाराष्ट्र पोलिसांचे (Maharashtra Police) कौतुक केले आहे. महाराष्ट्र पोलीस सदैव जनतेच्या सेवेसाठी तत्पर असतात असं म्हणत त्यांनी औरंगाबादमधील एका घटनेचं उदाहरण दिलं आहे.
सुळे यांनी ट्विट करत म्हटले की, महाराष्ट्र पोलीस सदैव जनतेच्या सेवेसाठी तत्पर असतात, याचं उदाहरण औरंगाबाद येथील पोलीस कर्मचारी हनुमंत चाळनेवाड यांनी दाखवून दिलं. एका परीक्षार्थीला वेळेत परीक्षा केंद्रावर सोडण्याचे काम त्यांनी केले . त्यांचं हे काम कौतुकास्पद आहे. औरंगाबादमध्ये शनिवारी लॉकडाऊन असल्यानं प्रवासासाठी वाहनांची सोय नव्हती. याच वेळी हनुमंत चाळनेवाड हे या तरुणीच्या मदतीला धावून आले.
महाराष्ट्र पोलीस सदैव जनतेच्या सेवेसाठी तत्पर असतात,याचे उदाहरण औरंगाबाद येथील पोलीस कर्मचारी हनुमंत चाळनेवाड यांनी दाखवून दिले. एका परीक्षार्थीला वेळेत परीक्षा केंद्रावर सोडण्याचे काम त्यांनी केले.त्यांचे हे काम कौतुकास्पद आहे. https://t.co/lXtlRM3vsj
— Supriya Sule (@supriya_sule) March 14, 2021
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला