आसाममध्ये भाजपा पुन्हा; पुद्दुचेरीत काँग्रेसला धोबीपछाड

Amit Shah - Narendra Modi

नवी दिल्ली : पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांचं मतदान झालं आहे. या राज्यात कोण बाजी मारणार याबाबत अनेक चॅनल्सने एक्झिट पोलनुसार निकालांचा अंदाज वर्तवला आहे. आसाममध्ये पुन्हा एकदा भाजपाचं कमळ फुलणार असून या ठिकाणी भाजपा सरकार बनवू शकतं अशी आकडेवारी आहे. राज्यात भाजपाला ८५ जागा मिळतील असा अंदाज दाखवण्यात आला आहे. तर काँग्रेसला (Congress) मागच्या वेळच्या तुलनेत काहीसा दिलासा मिळताना दिसत आहे. तर दुसरीकडे पुद्दुचेरीमध्ये काँग्रेसला झटका बसण्याचे संकेत असून भाजपा (BJP) सत्ता स्थापन करण्याची शक्यता आहे.

आसाममध्ये कोणाला मिळणार किती जागा?

भाजपा आघाडीला राज्यात ७५ ते ८५ जागा मिळण्याचा अंदाज

भाजपा : ६१-६५ , एजीपी – ९-१३ , यूपीपीएल – ५-७ जागा

काँग्रेस आघाडीला राज्यात ४० ते ५० जागा मिळण्याचा अंदाज

काँग्रेस – २४-३० , एआययूडीएफ – १३-१६ , बीपीएफ – ३-४ , तर अन्य १-४ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

एक्झिट पोलनुसार पुद्दुचेरीत कोणाला किती जागा?

भाजपप्रणीत एनडीएला – १७ ते १९ जागा

काँग्रेसप्रणीत यूपीएला – ११ ते १३ जागा

एकूण – ३० जागा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button