अफगाणीस्तानात सोन्याची खाण खचून 30 कामगार ठार, 15 जखमी

afgan

काबुल :- अफगाणीस्तानच्या बडाखशान प्रांतातील कोहिस्तान जिल्ह्यात आज सोन्याची खाण खचल्याने 30 जण ठार झाले असून 15 जण जखमी झाले आहेत.

हा अपघात खाणीत कामगार काम करत असताना घडल्याने मृतांची संख्या वाढली. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे.प्रांताच्या गव्हर्नरांचे प्रवक्ता मोहम्मद नजारी यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी सुमारे ११ वाजता ही घटना घडली. मेघालयातही गेल्या ३ आठवड्यांपासून १५ कामगार एका खाणीत अडकले आहेत. त्यांच्या सुटकेचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

अवैध पद्धतीने सुरू असलेल्या सोने आणि कोळशाच्या खाणीतच खाणमालक नियमबाह्य पद्धतीने खाणकाम करतात आणि निर्दोष कामगारांचे जीव जातात. बचावकार्यासाठी खाणीचे मॅपिंग आवश्यक असते, पण खाणच अवैध असल्याने मालकांकडे कोणते मॅपिंग नसते.