‘आदिपुरुष’मध्ये सैफ अली साकारणार आठ फुटांचा रावण

In 'Adipurush', Saif Ali will play the eight-foot Ravana

बॉलिवुडमध्ये (Bollywood) सध्या ज्या सिनेमाची सगळ्यात जास्त चर्चा आहे तो आहे ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ (Adipurush). ज्या दिवसापासून या सिनेमाची घोषणा झाली आहे त्या दिवसापासून या सिनेमाविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. याचे कारण म्हणजे हा रामायणावर आधारित सिनेमा असून बाहुबलीमुळे लोकप्रिय झालेला प्रभास यात रामाची भूमिका साकारणार आहे आणि सैफ अली (Saif Ali Khan) बनणार आहे रावण तोही 8 फूट उंची असलेला. सैफची उंची आहे 5 फुट 7 इंच पण स्पेशल इफेक्टसच्या सहाय्याने त्याला आठ फूटांचा केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. सिनेमाचे बजेटही कोट्यावधी रुपयांचे असल्याने हा सिनेमा अत्यंत भव्य-दिव्य अशा पद्धतीने तयार केला जाणार आहे.

काही दिवसांपूर्वी सैफने रावणाबाबत केलेल्या उद्गारांनी चांगलाच गदारोळ माजला होता. त्यासाठी सैफ मोठ्या प्रमाणावर ट्रोलही झाला होता. ट्रोल झाल्याने आणि त्याचा सिनेमार परिणाम होईल या भितीने अखेर सैफने माफी मागून रावणाबाबतचे वक्तव्य मागे घेतले होते. या सर्व पार्श्वभूमीवर सिनेमाचे शूटिंग कधीपासून सुरु होईल याची उत्सुकता प्रेक्षकांना होती. रावणाचे जसे वेळोवेळी वर्णन केले जाते तसा तो या सिनेमात अत्यंत भव्य, क्रूरकर्मा आणि शक्तीशाली दाखवला जाणार आहे. त्याच्या एंट्रीनेच प्रेक्षकांना धडक भरेल असा प्रयत्न दिग्दर्शक ओम राऊतचा आहे.

सैफने ओम राउतच्या तान्हाजीमध्ये खलनायक साकारला होता. त्याने ती भूमिका प्रचंड ताकदीने साकारली होती. प्रेक्षकांना त्याचा हा खलनायक आव़डला होता. त्यामुळेच ओम राऊतने ‘आदिपुरुष’मध्ये रावणाच्या भूमिकेसाठी सैफ अलीला विचारले आणि तोही ही भूमिका करण्यास लगेचच तयार झाला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 19 जानेवारीपासून आदिपुरुषचे मुंबईतील एका स्टुडियोमध्ये शूटिंग सुरु केले जाणार आहे. मात्र सैफ अली खान मार्चपासून सिनेमाच्या शूटिंगमध्ये भाग घेणार आहे.. याचे कारण आहे करीनाचे बाऴंतपण. करीना सध्या दुसऱ्यांदा गरोदर असून ती आता लवकरच पुन्हा आई होणार आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात करीना बाळंत होऊ शकते. त्यानंतर नवजात बालकासाठी सैफने सुट्टी घेऊन काम न करण्याचा निर्णय घेतल्याने तो मार्चमध्ये शूटिंगमध्ये भाग घेणार आहे

चित्रपटाचा दिग्दर्शक ओम राऊतने सांगितले, आम्ही लवकरच सिनेमाचे शूटिंग सुरु करणार आहोत. पण सैफ अली पेरेंटल लीव्हवर असल्याने त्याने मार्चपर्यंत कोणतेही शूटिंग न करण्याचा निर्णय घेतला आहे. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात तो आदिपुरुषचे शूटिंग सुरु करू शकेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER