काही दिवसात मोदी टीव्हीवर रडतील; ‘या’ खासदाराची भविष्यवाणी खरी ठरली

Maharashtra Today

दिल्ली : आम आदमी पार्टीचे राज्य सभेचे खासदार संजय सिंह(Sanjay Singh) यांनी शुक्रवारी दावा केला की, ‘काही दिवसात मोदी टीव्हीवर रडतील’ (Modi will cry on TV) ही माझी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल (Narendra Modi)केलेली भविष्यवाणी खरी ठरली! पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगने कोरोनाबाबत डॉक्टरांशी संवाद केला. यावेळी एकदा मोदींचा कंठ दाटून आला होता. मोदींना आलेला हा गहिवर सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरला आहे.

१७ एप्रिल रोजी दिलेल्या मुलाखतीमध्ये संजय म्हणले होते की, अजून थोडे दिवस वाट पाहा. ते (पंतप्रधान मोदी) तुमच्यासमोर येतील. ते फक्त त्यांच्या लाईट्स आणि कॅमेरासाठी वाट पाहत आहेत. ते टीव्हीवर रडतील आणि देशभरातील वृत्तवाहिन्या पंतप्रधान कसे भावूक झाले आणि रडू लागले यासंदर्भातील बातम्या चालवतील.

या मुलाखतीमधील काही भाग शेअर करत संजय यांनी मोदींवर शुक्रवारी ट्विटरवरुन टीका केली. “मी १७ एप्रिलला जे म्हणालो होतो ते २१ मे ला खरे ठरले. देशाला एक संवेदनशील आणि चांगल्या मनाचा व्यक्ती हवा आहे. ढोंग करणारे पंतप्रधान देशाला नको ज्यांनी स्वत: निवडणुकीदरम्यान प्रचारसभा घेऊन करोनाचा प्रसार केला आणि आता रडण्याचे नाटक करत आहेत”.

या संदर्भात उल्लेखनीय आहे की, वाराणसीमधील डॉक्टरांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने बोलताना करोनामुळे मरण पावलेल्यांबद्दलच्या चर्चेत मोदींचा कंठ दाटून आला. देशातील आणि वाराणसीमधील परिस्थितीबद्दल मोदी बोलत होते. करोनामुळे आपल्या जवळच्या अनेक प्रिय व्यक्तींना प्राण गमावावा लागला आहे, असे ते म्हणाले व करोनामुळे मरण पवालेल्यांना श्रद्धांजली अर्पण करताना मोदींना अश्रू अनावर झाले होते.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही. 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button