२०१७ साली कंगनाने २०.०७ कोटीत घेतला होता पाली हिल येथील बंगला

Kangana Ranaut

मुंबई : अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.  यावेळी तिच्या वांद्रे कार्यालयात मुंबई महापालिकेला काही अनियमितता आढळून आली. पण पाली हिल येथील हा बंगला खरेदी करण्यासाठी कंगनाने किती पैसे मोजले होते हे आता उघड झाले आहे. कंगनाने २०१७ मध्ये हा बंगला विकत घेतला होता. स्क्वायरफेटइंडिया डॉट कॉम या ऑनलाईन पोर्टलने याबाबत वृत्त प्रसारित केले आहे.

१८ सप्टेंबर २०१७ रोजी कंगनाने हा बंगला खरेदी केला होता. बंगला ३,०७५ चौरस फूट एवढ्या जागेत  असून, ग्राउंड आणि  तीन वरच्या मजल्यांची रचना आहे. कंगनाने बंगला मुंबा कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेडकडून विकत घेतला होता. तोच बंगला खरेदी करण्यापूर्वी तिथे याच ठिकाणी नाटक शाळा चालवायची. कागदपत्रांनुसार वांद्रे बंगला पाली हिल येथील चेतक सहकारी गृहनिर्माण संस्थेचा भाग आहे.

या बंगल्याच्या खरेदीसाठी कंगनाने  तब्बल २०.०७ कोटी रुपये भरले होते, हे बीएमसीला आढळून आले आहे. तिने स्टॅम्प ड्युटी म्हणून १.०३ कोटी रुपये भरले आणि बंगल्याबरोबर तिला ५६५ चौरस फूट कार पार्किंगही मिळाली. या वर्षाच्या सुरुवातीला, तिने त्याच बंगल्यात मणिकर्णिका स्टुडिओची पूजा केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER