१४९ जिल्ह्यांमध्ये आठवडाभरात एकही रुग्ण नाही; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची माहिती

Dr. Harshavardhan

मुंबई : केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन (Dr. Harshavardhana) यांनी मंत्र्यांसह २४वी बैठक केली. यामध्ये केंद्रीय मंत्री डॉ. एस जयशंकर, हरदीप सिंह पुरी आणि अश्विनीकुमार चौबे उपस्थित होते. या बैठकीत त्यांनी कोरोना (Corona virus) रुग्णांची आकडेवारीही सादर केली.आतापर्यंत १ करोड १९ लाख १३ हजार २९२ नागरिकांनी कोरोनावर मात केली आहे. देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्क्यांवर पोहचले आहे. आता ही आकडेवारी ९१.२२ टक्क्यांवर पोहचली आहे. १४९ जिल्ह्यांमध्ये मागील आठवड्यापासून एकही नव्या कोरोना रुग्णाची भर पडलेली नाही.

तर, ८ जिल्ह्यांमध्ये मागील दोन आठवड्यांपासून एकाही रुग्णाची नोंद नाही, अशी माहिती डॉ. हर्षवर्धन यांनी दिली. देशात व्हेंटिलेटर, ऑक्सिजन पुरवठा याबाबतही परिस्थिती काहीशी तणावपूर्ण आहे. त्यांनी यासंदर्भातील आकडेवारीही सादर केली. सध्याच्या घडीला देशात ०.४६ टक्के रुग्ण व्हेंटिलेटरवर असून, २.३१ टक्के रुग्ण ICU आहेत. तर ४.५१ रुग्ण ऑक्सिजन बेडवर आहेत. देशातील कोरोना मृत्युदर हा सातत्याने कमी होत आहे. त्यातच आरोग्य विभागात काम करणाऱ्या जवळपास ८९ लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.

तर, ५४ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे, असे डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले.महाराष्ट्रात फक्त १४ लाख लसी शिल्लक आहेत. राज्य शासनाचा दावा केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी फेटाळून लावला. या वैश्विक महामारीला नियंत्रणात आणण्यात अपयशी ठरलेल्या महाराष्ट्र सरकारकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. लसींच्या पुरवठ्याबाबत राज्यांना यासंदर्भातील माहिती वेळोवेळी दिली जाते, असेही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button