मशिदीत नमाज अदा करण्यावर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील ठाम

imtiyaz-jaleel

औरंगाबाद : कोरोना विषाणूला (Coronavirus) रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या (Lockdown) नियमांमध्ये शिथिलता आणली जात आहे. प्रत्येक टप्प्यात अधिकाधिक सवलती दिल्या जात आहेत. चौथ्या टप्प्यातील सवलती सोमवारी राज्य सरकारनं जाहीर केल्या. त्यात ई-पास रद्द केल्याची महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली.

मात्र, मंदिरे उघडण्याबाबत स्पष्ट काहीही सांगण्यात आले नाही. मंदिर-मशिदी उघडण्याची मागणी करणारी एमआयएम त्यामुळं आक्रमक झाली आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज यांनी आज (२ सप्टेंबर) औरंगाबादमधील मशिद उघडून नमाज अदा करणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे मंगळवारप्रमाणे आजही औरंगाबादमध्ये तणावपूर्ण स्थिती बघायला मिळू शकते. जलील यांनी आज दुपारी शहागंज येथील मशीद उघडून नमाज अदा करणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. त्यामुळे पोलिसांचा मोठा फौजफाटा बंदोबस्तात लावण्यात आला आहे. गर्दी होऊ नये यासाठी मोठी खबरदारी घेण्यात आली आहे. दरम्यान, मंगळवारी इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी औरंगाबादमधील (Aurangabad) खडकेश्वर मंदिर उघडण्यासाठी निवेदन देणार असल्याची घोषणा केली होती.

त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि इम्तियाज जलील यांच्यात मोठा वाद झाल्याचं पाहायला मिळालं. आमची मंदिरं उघडण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. मंदिरं उघडावी अशी आमचीदेखील इच्छा आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पाच-सहा दिवसांनंतर मंदिरांबाबत निर्णय जाहीर करणारच आहेत. त्यामुळे इम्तियाज जलील यांनी राजकारण करू नये. त्यांना आम्ही मंदिर उघडू देणार नाही, असं चंद्रकांत खैरे यांनी सांगतिलं. तसेच तुम्ही मंदिराला हात तर लावून दाखवा, मग आम्हीदेखील उत्तर देऊ, असा इशारादेखील चंदकांत खैरे यांनी इम्तियाज जलील यांना दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER