इम्तियाज जलील शक्तिप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल करणार

imtiyaz-jaleel

मुंबई :- आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीतर्फे आज औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार इम्तियाज जलील शक्तिप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. इम्तियाज जलील आज दुपारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला  अभिवादन करून रॅलीद्वारे अर्ज दाखल करण्यासाठी जाणार आहेत. सोशल मीडियावर कार्यकर्त्यांनी आमची ताकद रॅलीमध्ये बघा, अशी पोस्ट शेअर केली होती . जिल्ह्यातील सर्व एमआयएमचे तसेच भारिप बहुजन महासंघाचे पदाधिकरी कार्यकर्ते, काही मुस्लिम संघटनांचे पदाधिकारी या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत.

दरम्यान वंचित बहुजन आघाडीतर्फे आमदार इम्तियाज जलील यांना उमेदवारी देण्याचा निर्णय हैदराबाद येथील बैठकीत अ‍ॅड. असदुद्दीन ओवेसी यांनी जाहीर केला होता . तसेच वंचित बहुजन आघाडीच्यावतीने उमेदवार असल्याने मुस्लिम आणि दलित मतांचे एकत्रीकरण होईल आणि अधिक मते मिळतील, असा एमआयएमचा दावा आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडीला जेवढी मते मिळतील, तेवढे काँग्रेसच्या मतांचे विभाजन होईल आणि त्याचा लाभ युतीच्या उमेदवाराला होईल, असे गणित सांगितले जात आहे.

ही बातमी पण वाचा : आंबेडकरांच्या नेतृत्वात धनगर समाजाचा पहिला खासदार लोकसभेत पाठवणार : शेंडगे