खा. इम्तियाज जलील यांनी मनपाच्या रिक्षाची काच फोडली

ANC Glass Break

औरंगाबाद : सलीम अली सरोवराच्या पाठीमागील भागात महापालिकेने कचर्याच्या वाहनांसाठी पार्किंगची केली आहे. या ठिकाणी कचऱ्यावर प्रक्रिया करणारे छोटे केंद्रही उभारले आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो. नागरिक या भागात फिरण्यासाठी येतात. शुक्रवारी रात्री नागरिकांच्या मागे कुत्र्यांची टोळी लागली. त्यामुळे खा. इम्तियाज जलील यांनी मनपाच्या रिक्षाची काच फोडली. विधानसभा निवडणुकीपूर्वी जलील यांनी कचरा प्रक्रिया केंद्र,
वाहने उभे करणारे केंद्र दुसरीकडे न्यावे असा इशारा मनपा आयुक्तांना दिला होता.

त्यांनी मनपा प्रशासनाला १५ दिवसांचा वेळही दिला होता. मनपा प्रशासनाने याकडे लक्ष दिले नाही. निवडणूक पार पडताच जलील यांनी पुन्हा या प्रश्नात हात घातल्याचे दिसून आले. शुक्रवारी रात्री या भागात नागरिक वॉकिंगसाठी बाहेर पडले. पन्नासपेक्षा अधिक कुत्रे नागरिकांच्या मागे लागले. नागरिकांनी ही बाब खा. जलील यांच्या कानावर घातली. त्यांनी कचरा प्रक्रिया केंद्रावर जाऊन पाहणी केली असता कचऱ्याचे ढीग दिसले. तेथे उभ्या रिक्षांपैकी एका रिक्षाची काच त्यांनी फोडली.

होय मी रिक्षाची काच फोडली. यापूर्वी अनेकदा इशारा दिल्यानंतरही मनपा प्रशासनाने याची अजिबात दखल घेतली नाही. दुर्गंधीसह मोकाट कुत्र्यांचा प्रचंड त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.त्यामुळे मला टोकाची भूमिका घ्यावी लागली. असे इम्तियाज जलील यांनी सांगितले. नागरी वसाहतीमध्ये कचरा प्रक्रिया केंद्र कसे काय सुरू करता? असा प्रश्नही जलील यांनी उपस्थित केला.

खा. जलील यांनी घेतलेली भूमिका अयोग्यलोकप्रतिनिधींनी मनपाला सहकार्य करायला हवे. खा. जलील यांनी घेतलेली भूमिका अयोग्य आहे.कायदा हातात घेणे, काच फोडून राग व्यक्त करणे अशोभनीय आहे. जेव्हा या ठिकाणी ओल्या कचऱ्यावरप्रक्रिया करण्यात येत होती, तेव्हा यांनीच स्वागत केले होते. आता अशात नेमके काय झाले. अशा लोकप्रतिनिधींचा जनतेने काय आदर्श घ्यावा, असे महापौर नंदकुमार घोडेले यांनी नमूद केले.