परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्या – इम्तियाज जलिल

मुख्यंमंत्रींकडे केली मागणी

Imtiaz Jalil

औरंगाबाद : मराठवाडा आणि औरंगाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे वेचणीला आलेला कापुस काळवंडला तर मका, बाजरी, सोयाबीनला कोंब फुटले शिवाय इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. खरीप हंगामाच्या सुरवातीला मराठवाड्यात आणि औरंगाबाद जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने अगोदरच उशीराने खरीपाची पेरणी झाली. काही शेतकरयांनी दुबार पेरणी केली. पेरणी नंतर पावसाचा मोठ खंड पडला तरी शेतकर्यांनी आपली पिके जगविली. मात्र मारगील पंधरा दिवसांपासून परतीच्या पावसामुळे मराठवाड्यात आणि औरंगाबाद जिल्ह्यात शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले.

हे आर्थिक नुकसान भरुन निघण्यासारखे नसल्याने नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करुन सरसकट सर्वच शेतकर्यांना नुकसान भरपाई देण्यात यावे अशी मागणी एका निवेदना व्दारे हे मुख्यमंत्र्यांना करण्यात आली. जिल्ह्यासह मराठवाड्यात मागील अठवड्यापासून अचानक पाऊस अल्याने शेतकर्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्या मुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. सध्या बाजारी, मकाचे पिक काढणीला आले होते. सोंगणी केलेली बाजरी आणि मकाचे कणीस पाण्यात तरंगत आहे. अनेक ठिकाणी तर मकाच्या उभ्या झाडाला असलेल्या कानिसला मोड आली आहे. मोठे झाले आहे. बाजरी खाण्यायोग्य राहिली नाही तर मका सुद्धा हातातून गेला मका आणि बाजरीचे खुप नुकसान कापुस वेचणीला आला मात्र पावसामुळे हा कापुस काळवंडला आहे. महत्त्वाचे म्हणजे पिकांचे नुकसान झाल्यानंतर संबंधित पीक विमा कंपन्यांकडे ४८ तासांमध्ये माहिती द्यायची असती; मात्र त्या कंपन्याच नॉट रिचेबल असल्याने आम्ही जावे तरी कुणाकडे, असा मोठा पेच शेतकरयांसमोर उभा ठाकला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानी पंचनामे करुन सर्वच शेतकर्यांना सरकसट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. यामध्ये ज्या शेतकर्यांनी खरीपाचा पिक विमा काढला नसेल तरी ही शेतक-यांना नुकसान भरपाई द्यावी.