हर्षवर्धन जाधव आणि जलील यांची समजूतदारीची भूमिका ; नागरिकांना शांततेचे आवाहन

Harshwardhan-Jadhav-Imtiaz-Jalil

औरंगाबाद :- एमआयएमच्या कार्यकर्त्याने शिवाजी महाराजांची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप औरंगाबाद मतदारसंघातील अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी केला होता. यामुळे औरंगाबादमध्ये शनिवारी मोठ्या प्राणावर तणावाचे वातावरण पाहायल मिळाले. याची जाणीव होताच इम्तियाज जलील यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रसारित केला असून शहरातील नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे. त्यानंतर आता हर्षवर्धन जाधव यांनीही माघार घेत शहरातील नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे.

दोन दिवसांपूर्वी एका एमआयएमच्या कार्यकर्त्याने शिवाजी महाराजांची प्रतिमा मलिन करणारे वक्तव्य केलं आहे. याप्रकरणी एमआयएमने माफी मागितली नाही तर त्यांचे शहरातील सर्व कार्यालये तोडले जातील अशा इशारा जाधव यांनी फेसबूक पोस्ट टाकत दिला आहे . एमआयएम कट्टरपंथीयवाद औरंगाबाद शहरात निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे हिंदू समाजाची अस्मिता धोक्यात आली आहे असा आरोप हर्षवर्धन जाधवांनी केली. यासंदर्भात त्यांनी पोलीस आयुक्तांना माहिती दिली आहे. जर त्यांनी कारवाई केली नाही, तर मी स्वतः कारवाई करेल, असेही ते म्हणाले होते.