इम्रान खान सरकारने नवाझ शरीफ यांना केले फरार घोषित

Imran Khan government declares Navaz Sharif absconder

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारने माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना फरार घोषित केले आहे. इम्रान खान यांच्या अध्यक्षतेत पाकिस्तानच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

माजी पंतप्रधान नवाझ शरीफ हे सध्या लंडनमधील इस्पितळात उपचार घेत आहेत. त्यांनी जामीनविषयक अटींचे उल्लंघन केल्याचा ठपका पाकिस्तान सरकारने ठेवला आहे.

शरीफ यांच्या जामिनास मुदतवाढ न देण्याचा निर्णय दरम्यान, पंजाब सरकारने घेतला होता.

नवाझ शरीफ हे तीन वेळा पाकिस्तानचे पंतप्रधान होते. मागील वर्षी ते लंडनला उपचारासाठी गेले. त्यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये पाकिस्तानच्या न्यायालयाने दोषी ठरविले आहे.

दरम्यान, शरीफ यांनी पाठविलेला त्यांच्या आरोग्याबाबतचा अहवाल पाकिस्तानच्या वैद्यकीय मंडळाने फेटाळून लावलेला आहे.

दिल्लीतील वादळ शमवण्यासाठी मोदी-शाहांचा खास मोहरा डोवाल मैदानात