इमरान हाशमीही आता खलनायकाच्या भूमिकेत

बॉलिवूडमध्ये (Bollywood news) काही हिट सिनेमे दिल्यानंतर नायक हवेत असतात. पण जेव्हा त्यांचे सिनेमे फ्लॉप होऊ लागतात तेव्हा मात्र ते जमिनीवर येतात आणि काम मिळवण्यासाठी अॅडजेस्टमेंट करू लागतात. काही कलाकार एखाद्या कॅम्पचे कलाकार बनतात. त्यांचे सिनेमे यशस्वीही होतात पण नंतर काही काळाने कॅम्प सिनेनिर्मिती कमी करतो तेव्हा कलाकारांना बाहेर काम शोधावे लागते. इमरान हाशमी (Imran Hashmi) असाच भट्ट कॅम्पचा नायक म्हणूनच ओळखला जातो. महेश भट्ट (Mahesh Bhatt) यांच्यासोबत इमरानने हिट सिनेमे दिले पण आता महेश भट्ट स्वतःच अत्यंत कमी काम करू लागल्याने इमरानकडे तसे काम नाही. इमरानने 10 वर्षांपूर्वी म्हणजे 2011 मध्ये विद्या बालन आणि नसीरुद्दीन शाह अभिनीत ‘द डर्टी पिक्चर’मध्ये काम केले होते. हा सिनेमा हिट झाला होता. त्यानंतर मात्र त्याचे काही सिनेमे आले पण सगळे बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले होते. त्यामुळेच इमरानने काम मिळत राहावे म्हणून खलनायकाची भूमिका करण्याचा निर्णय घेतला आहे.

‘द डर्टी पिक्चर’ नंतर इमरानने ‘हमारी अधूरी कहानी’, ‘अजहर’, ‘बादशाहो’ सिनेमे केले होते पण ते फ्लॉप झाले. एवढेच नव्हे तर सोलो हीरो म्हणूनही त्याची बॉक्स ऑफिसवरील किंमत कमी झाली आहे. त्यामुळेच अमिताभसोबत त्याचा चेहरे सिनेमा तयार असूनही रिलीज होऊ शकलेला नाही. मल्टीस्टारर ‘मुंबई सागा’मध्येही त्याने काम केले असून हा सिनेमा मात्र ओटीटी वर रिलीज केला जाणार आहे. यशराजमधून मिळालेल्या माहितीनुसार यशराज प्रॉडक्शनने इमरान हाशमीला त्यांच्या बहुचर्चित आणि भव्य ‘टायगर 3’ सिनेमात खलनायक म्हणून साईन केले आहे.

सलमान खान नायक असल्याने टायगर फ्रेंचाईजीमध्ये साधारण कलाकारच खलनायक म्हणून घेतले आहेत. खरे तर महेश भट्ट आणि यशराज हे दोन मोठे कॅम्प असून यश चोप्रा आणि महेश भट्ट यांचे कधीही जमले नाही. अशा स्थितीत यशराजने इमरानला त्यांच्या कॅम्पमध्ये एंट्री देण्यावरूनही बॉलिवूडमध्ये चर्चा सुरु झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER