‘जम्बो कोविड केअर’ची स्थिती सुधारा; पुण्यात मनसेचे आंदोलन

MNS agitation in Pune

पुणे : ‘जम्बो कोविड सेंटर’मध्ये तत्काळ सोई उपलब्ध करा, अशी मागणी मनसेच्या महिलाध्यक्ष रुपाली पाटील-ठोंबरे यांनी केली. रुपाली यांनी गुरुवारी ‘मनसे स्टाईल’ने केले. गेटवरुन चढून जम्बो सेंटरमध्ये प्रवेश केला. रुग्णांची हेळसांड होत असल्याबद्द्ल विभागीय आयुक्तांना जाब विचारला.

जम्बो सेंटरमधील नियोजनाच्या अभावामुळे तसेच पीएमआरडीए आणि पालिकेमधील समन्वयाच्या अभावामुळे रुग्ण हवालदिल झाले आहेत. पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूमुळे अन्य रुग्ण घाबरले असून येथील वैद्यकीय कर्मचारी आणि डॉक्टरही घाबरले आहेत, असे पाटील म्हणाल्या. पाटील यांना गेटवरच बाऊन्सरने अडविले. त्यांच्यासोबत कॉंग्रेसचे ॠषीकेश बालगुडे व इतर कार्यकर्ते होते. बाऊन्सर आतमध्ये सोडत नसल्याने थेट गेटवर चढून रुपाली आत गेल्या. त्यांच्या पाठोपाठ सर्व कार्यकर्ते आतमध्ये गेले.

त्यावेळी विभागीय आयुक्त राव ‘जम्बो’मध्ये बैठक घेत होते. रुपाली यांनी त्यांच्याकडून व्यवस्थेबाबत माहिती घेतली.
शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे यांनीही पालिका आयुक्तांना पत्र देऊन जम्बो कोविड सेंटरमधील त्रुटी दूर करण्याची मागणी केली आहे. पीएमआरडीए आणि पालिकेमध्ये समन्वय निर्माण करा, रुग्णांना सुविधा उपलब्ध करुन द्या, रुग्णवाहिकेची आणि मनुष्यबळाची व्यवस्था करा, अशी मागणी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER